गेवराई – बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या, लिपिक पदाच्या 2023 च्या लेखी परिक्षेत गोंजारे शहादेव बाळासाहेब, रा. सुशी ता. गेवराई जि.बीड यांनी घवघवीत यश संपादन केले असून, जिल्हा कोषागार कार्यालय,पुणे येथे त्यांची टंकलेखक [ लिपिक ] म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्द गोजारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2023 मध्ये लिपिक [ टंकलेखक ] पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, गोंजारे शहादेव यांना खुल्या गटातून [ईडब्लूएस ] यश मिळाले आहे. लिपिक पदाच्या परिक्षेत त्यांनी यश संपादन केल्याने, पुणे येथील सहसंचालक, लेखा व कोषागार कार्यालय पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्द शहादेव गोंजारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ते गेवराई तालुक्यातील सुशी सारख्या ग्रामीण भागातील भूमिपुत्र आहेत. त्यांनी चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, गावाला त्यांचा अभिमान आहे.






