गेवराई – बीड : गेवराई तालुक्यात शनिवार ता. 13 जूलै च्या रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाने नदी – नाल्यांना पूर आला आहे. रात्रभर कोसळधार राहील्याने गेवराई तालुक्यातील गेवराई-उमापूर राज्य मार्ग आणि गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, कामा शिवाय बाहेर पडू नका. काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेवराई शहरातील आजूबाजुचे पाझर तलाव गेल्याच महिन्यात ओव्हर फ्लो झालेत. एक दोन मंडळावर कमी पाऊस पडला होता. काही मंडळात मुसळधार पाऊस पडल्याने, पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या मंडळात पाण्याची साठवण झाली नाही. अशा, परिसरात शनिवार, रविवारच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. कापूस व इतर पिके जोरात आली आहेत.
गेवराई तालुक्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार ता. 13 जूलै रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाची रात्रभर उघडझाप सुरू होती. मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरल्याने, या कोसळधारेने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. गेवराई तालुक्यातील गेवराई-उमापूर राज्य मार्ग आणि गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उमापूर मंडळात पावसाने कृपा केली. जून, जूलै आणि ऑगस्ट, या तीन महिन्यात फारसा पाऊस झाला नव्हता. पाणी साचले नव्हते. केवळ पिकांना दिलासादायक पाऊस झाल्याने, उमापूर, जातेगाव धोंडराई परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होते. अखेर, या परिसरात दमदार पाऊस झाला असून, शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, कामा शिवाय बाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






