Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

गेवराई तालुक्यात पाणीच पाणी – बळीराजा सुखावलाघराबाहेर पडू नका – तहसीलदार संदीप खोमणे – गेवराई तालुक्यात कोसळधार – अनेक गावांचा संपर्क तुटला , सहा मंडळात मुसळधार, सर्वाधिक पाऊस धोंडराई परिसर, गोदावरी नदीला आला पूर, नागरिकांची मोठी गर्दी

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
September 14, 2025
in महाराष्ट्र
गेवराई तालुक्यात पाणीच पाणी – बळीराजा सुखावलाघराबाहेर पडू नका – तहसीलदार संदीप खोमणे – गेवराई तालुक्यात कोसळधार – अनेक गावांचा संपर्क तुटला , सहा मंडळात मुसळधार, सर्वाधिक पाऊस धोंडराई परिसर, गोदावरी नदीला आला पूर, नागरिकांची मोठी गर्दी

गेवराई – बीड : गेवराई तालुक्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावून, सगळीकडे पाणीच केले आहे.
शनिवार ता. 13 जूलै च्या रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाने नदी – नाल्यांना मोठा पूर आला आहे. गोदावरी नदीचे भव्यदिव्य पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. पैठणच्या नाथसागरातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्रभर कोसळधार राहील्याने गेवराई तालुक्यातील गेवराई-उमापूर राज्य मार्ग आणि गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नागरिकांनी कामा शिवाय बाहेर पडू नये. स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे. गेवराई तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाले असून, बळीराजा सुखावला आहे.

 गेवराई तालुक्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार ता. 13 जूलै रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाची रात्रभर उघडझाप सुरू होती. मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरल्याने, या कोसळधारेने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गेवराई तालुक्यातील गेवराई-उमापूर राज्य मार्ग आणि गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजुने आलेली वाहने थांबली आहेत. पाणी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, गोदापात्र दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा येवा जास्त आहे. त्यामुळे, पाणी तुंबल्याने गेवराई-राक्षसभुवन रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. उमापूर मंडळात पावसाने कृपा केली. जून, जूलै आणि ऑगस्ट, या तीन महिन्यात फारसा पाऊस झाला नव्हता. पाझर तलावात पाणीच साचले नव्हते. केवळ पिकांना दिलासादायक पाऊस झाल्याने, उमापूर, जातेगाव, चकलांबा परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होते. अखेर, या परिसरात दमदार पाऊस झाला असून, शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

दरम्यान, कामा शिवाय घरा बाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले असून, आमचा महसूल विभाग
परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे.13 सप्टेंबर च्या एकाच रात्रीत 94.6 मिमी पाऊस झाला आहे. शहागड- गेवराई- बीड राष्ट्रीय महामार्गावरचा गोदाकाठ दुथडी भरून वाहत असून, शहागडच्या पुलाजवळ पाणी आले आहे. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, गोदाकाठच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे.गेवराई तालुक्याची सरासरी 587 मिमी आहे. 14 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत गेवराई शहर व परिसरात 587.7 मिमी पाऊस झाला आहे. आणखी पावसाची गरज आहे. म्हणजे, पाणी साठा वाढायला मदत होईल आणि रब्बी च्या पिकांना चांगली मदत होईल.खरीप हंगामातील पिके चांगली आलीत. तूर, कापूस, मूग , सोयाबीन इ. पिके चांगली बहरली आहेत. त्याच बरोबर, गोदाकाठाच्या व जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा सर्व क्षेत्रातील उसाला चांगला फायदा झाला आहे.गेवराई तालुक्यातील नद्या, नाले, उपलब्ध नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेतात पाणीच पाणी झाले आहे.सर्वच मंडळात मुसळधार पाऊस झाला असून, शेतकर्‍यांचे शेतात पाणी साचले आहे. गोरगरीब नागरिकांच्या काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. उस, कापूस पिकांना फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनगेवराई तालुक्यातील,गेवराई, उमापूर, धोंडराई, रेवकी, तलवडा या सर्व मंडळात अतिवृष्टी झाली आहे. धोंडराई आणि उमापूर परिसरात पावसाची सर्वाधिक नोंद [ 198 व 139 मिमी ] झाली आहे. त्या पाठोपाठ चकलांबा [ 131मिमी ], रेवकी [ 143मिमी ], तलवडा [94मिमी ] ,गेवराई शहरात 88 मिमी पाऊस झाला आहे. गेवराई व तलवडा परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडला आहे. तरीही, गेवराई शहरात व परिसरात नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागलेत. पाडळसिंगी, पाचेगाव, जातेगाव, सिरसदेवी, सिरसमार्ग, तलवडा, मादळमोही परिसरातील पाणी परिसंस्था, या आधीच ओव्हर फ्लो झाल्या आहेत. शनिवारी ता. 13 रोजी पडलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. विशेष म्हणजे, उमापूर, चकलांबा, मादळमोही परिसरातील काही भागात पाण्याची गरज होती. या परीसरात मुबलक पाऊस पडलाच नव्हता. त्यामुळे, येथील पाझर तलाव, नदी, नाले, विहिरी, बोअर, विंधन विहीर आणि अन्य स्तोत्र पावसाच्या प्रतीक्षेत होते. दोन दिवसात झालेल्या पावसाने आनंदी आनंद झाला असून,
पडलेल्या पावसाने बळी राजा सुखावला आहे.


Previous Post

समाजकारण, शिक्षण आणि आरोग्य साधनेतून घडलेले व्यक्तिमत्त्व – शिवाजी भाऊ रांजवण पाटील

Next Post

युवा महोत्सवात भूमिपुत्रांचा जागर

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
युवा महोत्सवात भूमिपुत्रांचा जागर

युवा महोत्सवात भूमिपुत्रांचा जागर


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group