गेवराई – बीड : वार्ताहर : गोरगरीब गायरान धारकांच्या न्याय व हक्कासाठी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले गट ] बीड जिल्हा शाखेच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी, बीड जिल्हा अधिकारी कार्यालया समोर भव्य महाधरणे आंदोलन करण्यात येणार असून , या आंदोलनासाठी गायरान धारकांनी
हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई चे ज्येष्ठ नेते महादेव बनसोडे यांनी केले आहे.
23 सप्टेंबर रोजी होणारे
महाधरणे आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात सरकारकडे निवेदन सादर करून, काही मागण्या करण्यात येणार आहेत.
1990 च्या शासन नियमानुसार गायरान धारकांच्या, गायरानाचा प्रश्न निकाली काढण्यात यावीत. गोरगरीब गायरान धारकांना महिन्याला तीन हजार रू मानधन देण्यात यावे. गायरान धारकांच्या सातबारावर पोटखराब क्षेत्र काढून टाकण्यात यावे. या प्रमुख मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात करण्यात आल्यात. सरकारने गायरान धारकांचे प्रश्न सोडविण्यात चालढकल केली आहे. गायरान धारक तीस चाळीस वर्षापासून शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवीत आहेत. तरीही, सरकार सातबारावर नाव टाकीत नाही. हा अन्याय दूर कधी होणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळेच, गोरगरीब गायरान धारकांच्या न्याय व हक्कासाठी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले गट ] बीड जिल्हा शाखेच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी, बीड जिल्हा अधिकारी कार्यालया समोर भव्य महाधरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनासाठी गायरान धारकांनी
हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई चे ज्येष्ठ नेते महादेव बनसोडे यांनी केले आहे.






