गेवराई – बीड – गेवराई तालुक्यातील विविध भागाला, सोमवारी पून्हा मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले असून, शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. शहराच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण भागाकडच्या गावातील नागरीकांचे रस्ते पाण्यात गेले आहेत. त्यामुळे, संपर्क तुटला आहे. काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उच्चभ्रू वस्ती असलेला श्री दत्त पार्क एका बाजुने पाण्याने वेढल्याने चिंता व्यक्त केली जात असून, कुठलीही अप्रिय घटना घडू नये, गेवराई तहसील व नगर परिषदेच्या प्रशासनाने घटनास्थळी कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवला आहे. गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे भल्या पहाटेच उमापूर-चकलांबा परिसरातील पाणी परिस्थिती पहाणी करण्यासाठीच गेले आहेत. तहसील प्रशासन सतर्क झाले आहे. पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेत.
विवार ता. 21 च्या रात्री पासून कोसळधार सुरू झाली. रात्री अकरा वाजता पावसाला सुरुवात झाली. कधी जोरात तर कधी संततधार पाऊस सुरू होता. सोमवारी पहाटे पावसाने उसंत घेतली. गेवराई शहर व तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला असून, जवळपास 90 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. गेवराई, चकलांबा, उमापूर परिसराला पावसाने झोडपून काढल्याने, नदी नाल्यांना पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने, नुकसान झाले आहे. गेवराई शहरातील दत्त पार्कला पाण्याचा वेढा पडला. गेवराई शहरातून दत्त पार्क कडे जाण्यासाठी एक पूल बांधण्यात आलेला आहे. तो पूल पाण्यात गेल्याने संपर्क तुटला आहे.
गेवराई-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जमादानीच्या पुलाला पाणी लागले आहे. सोमवारी दिवसभर पाऊस झाल्यास, राष्ट्रीय महामार्गावर पाणी येईल आणि पूल बंद पडेल. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गेवराई शहराच्या पश्चिम दिशेला मन्यारवाडी,गोविंदवाडी आदि दहा बारा गावे आहेत. शहरात येण्यासाठी चिंतेश्वर मंदिरा जवळ छोटा पूल आहे. तो पूल रात्री पासून पाण्यात आहे. मन्यारवाडी जवळ गेवराई चिंतेश्वर विद्यालय आहे. पुलावर पाणी आल्याने शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका बोर्डे मॅडम यांच्यासह शिक्षकांची टीम, सकाळ पासून पुलाजवळ थांबून, विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सूचना करत आहेत.गेवराई शहरा जवळून वाहणार्या विद्रुपा नदीला पूर आला असून, नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. महादेवाच्या मंदिरातपाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे, सकाळी भाविकांना दर्शन घेता आले नाही.दरम्यान, पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने, गेवराई – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेला जमादारनीचा पूल धोकादायक होऊ शकतो. आणखी पाऊस आल्यास, राष्ट्रीय महामार्गावर पाणी येईल, अशी भिती वाटत आहे. गेवराई जवळचा जमादारनीचा पूल, दत्त पार्क
, मन्यारवाडी, या विद्रूपा नदीपात्रात असलेल्या चार ठिकाणच्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, रविवार ता. 21 रोजी रात्रभर कोसळधार राहील्याने, गेवराई तालुक्यातील विविध भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी संपर्क तुटला. चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील गंगावाडीचा पूल पाण्यात गेला आहे. गेवराई-शेवगाव राज्य रस्त्यावर पाणी आले आहे. गेवराई – शेवगाव रस्त्यावर,
धोंडराई जवळचा पूल पाण्यात गेला आहे. त्यामुळे, दोन्ही बाजुंची वाहतुक बंद आहे. रविवार च्या एकाच रात्रीत 90 मिमि पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती आहे. गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी पावसाचा आढावा घेऊन, पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आला आहे.






