गेवराई – बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापती पदावर सामाजिक कार्यकर्ते श्रीहरी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमवार ता. 22 रोजी सदरील निवड जाहीर करण्यात आली आहे. श्रीहरी पवार हे ताकडगाव ता. गेवराई येथील भूमिपुत्र आहेत. ते उच्च शिक्षित असून, सामाजिक, राजकीय चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा फळीतले कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जात असून, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे [ अजित दादा गट ] नेते अमरसिंह पंडीत यांच्या नेतृत्वाखाली श्रीहरी पवार सक्रिय काम करत आहेत. सोमवार ता. 22 रोजी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उप सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत दोनच अर्ज आल्याने, उप सभापती पदावर श्रीहरी पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर, त्यांच्यावर विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.






