गेवराई – बीड : उमापूर ता.गेवराई जि.बीड परीसरात भूगर्भातून मोठा आवाज झाल्याने, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अचानक झालेल्या आवाजाचे रहस्य काय ? असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.
मंगळवार ता. 30 रोजी दु. एक वाजता मुंगी ता. पैठण च्या दिशेने आवाज झाल्याचे समजते. दरम्यान, गूढ आवाजाने उमापूरचा परिसर हादरला असून, मोठा आवाज होताच, घरावरची पत्रे हादरली. हा आवाज दूरवर ऐकू गेला आहे. आपल्याच घराच्या मागे आवाज झाल्याचा भास झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
सोशल माध्यमांवर गूढ आवाजाची विचारणा केली. अनेकांनी आवाज झाल्याचे मान्य केले. आता, हा आवाज नेमका कशाचा ? अशी विचारणा करण्यात येत होती. मात्र, गूढ आवाजाचे रहस्य काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सदरील आवाजाने नागरिकांमध्ये भिती व्यक्त करण्यात आली आहे.






