गेवराई- बीड : गेवराई तालुक्यातील उमापूर-राक्षसभुवन शेत शिवारात
बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली असून, परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,
तो बिबट्याच होता का, या विषयी वन विभागाने खात्री करून घ्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. सदरील प्राण्यांच्या पायाचे ठसे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, मंगळवार ता. 30 रोजी उमापूर – राक्षसभुवन परीसरात दुपारी दोन वाजता एक बिबट्या सदृश मादी आणि तीन पिल्ले दिसल्याचे शेतकर्यांनी सांगितले आहे.
गेवराई तालुक्यातील उमापूर-राक्षसभुवन रस्त्यावरच्या शिवारात एक बिबट्या आणि तीन पिल्ले आढळून आली आहेत. मंगळवार ता. 30 रोजी दुपारी शेत शिवारातून वस्तीवर जाणाऱ्या शेतकर्याने बिबट्याला पाहिले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शेतात जाणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. या आधी ही, गेवराई तालुक्यातील विविध भागात बिबट्या आढळून आला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करून घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ज्या ठिकाणी हे प्राणी आढळून आले आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या पायाचे ठसे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत. एक बिबट्या मादी आणि तीन पिल्ले बराच वेळ त्या परीसरात फिरताना पाहिले असून, ती बिबट्या मादीच होती.असा दावा शेतकर्यांनी केला आहे.





