गेवराई – बीड : गेवराई शहरातून शहागड कडे भरधाव वेगात जाणारी चार चाकी पिकअप ,चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडल्याने, झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी ता. 9 रोजी रात्री गेवराई शहरा जवळ घडली आहे.
सदरील पिकअप मध्ये अन्य कोणी प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शुक्रवार सकाळी माॅर्निंग वाॅकला आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत कोणी अडकले आहे का ,याची खात्री केली. मात्र, घटना घडल्यानंतर, जखमी चालक स्वतःच गाडीच्या बाहेर आल्याचे सांगण्यात आले. गुरूवार ता. 9 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी पिकअप गेवराई शहरातून भरधाव वेगात शहागड कडे निघाली होती. सदरील गाडी जमादारणीच्या पुलावरून जात असतानाच, अचानक चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून पिकअप नदीत पडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे.
			





