गेवराई : बीड : शेतात काम करून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका शेतकरी जोडप्यास, बीड कडून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने; झालेल्या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवार ता. 16 रोजी रात्री साडे सात वाजता गेवराई जवळ राष्ट्रीय महामार्गावर झमझम पेट्रोल पंपाजवळ घडली. घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आजूबाजूलाच असलेल्या नागरीकांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अर्धा तास होऊन ही हाय वे पोलीस घटनास्थळी आले नाहीत. विशेष म्हणजे, हाय वे पोलीसांचा ताफा पाडळसिंगी टोल नाक्यावर 24 तास उभे असतात. झमझम पेट्रोल पंप, बायपास चौक ते पाडळसिंगी टोल नाका दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ॲम्बुलन्स उशिरा आल्या. टोल नाक्यावर मुजोरी करणारे अपघातात तातडीने मदत करीत नाहीत. असा, अनुभव आहे. दरम्यान, गेवराई येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले दत्ता नाईक [टेलर] अत्यंत गरीब स्वभावाचे आहेत. गुरूवारी सायंकाळी शेतात काम करून,
ते आपल्या स्कुटवरून घराकडे जात होते. झमझम पेट्रोल पंपाजवळच्या बायपास चौकातून रस्ता ओलांडत असतानाच, बीड कडून शहागड कडे भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने, टेलर आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागरिकांनी मदत केली. ते दोघेही खूप घाबरले होते. एका डाॅक्टरांनी दोघांनाही तपासून मदत केली आहे.
हरामखोर चालक पळुन गेला. दोन युवकांनी त्या गाडीचा पाठलाग केला आहे. एवढ्या वेळात हायवे पोलीस घटनास्थळी आले नाहीत. पोलीस नेहमी उशिराच येते. हा अनुभव पून्हा आल्याने, पाडळसिंगी टोलनाक्यावर चोवीस तास अलर्ट असलेले पोलीस, नेमके काय करतात, हाच प्रश्न पडतो.टोलनाक्यावर उभी असलेली ॲम्बुलन्स उशिराच आली. तिथेला व्यवस्थापक मुजोरी करतो. हायवे- पोलीस आणि टोलनाका कोणत्याच कामाचे नाहीत. असा अनुभव अपघातात जखमी झालेल्यांना अनेकदा आलेला आहे. विशेष म्हणजे, झमझम पेट्रोल पंपावर जवळच्या बायपास वर नेहमीच अपघात होतात. रात्री वाहनांच्या लख्ख प्रकाशात, छोट्या वाहनांना फारसे दिसत नाही. वाहने वेगात असतात. त्यामुळे, या चौकात गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडून या चौकाची पाहणी व्हावी, अशी अपेक्षा या परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
			





