बीड –  :- आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते मा. खा. डॉ. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. चंद्रकांत नवले यांची गेवराई कार्यक्षेत्रासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. 
ॲड.चंद्रकांत नवले हे मूळचे शिवसैनिक असून त्यांना पक्ष संघटनेचा मोठा अनुभव आहे. त्यांनी हिंदुत्वाचा विचार आणि हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी सिव्हिल इंजीनियर पदाचा राजीनामा देऊन महाविद्यालयीन सवंगड्यांना सोबत घेऊन स्वतः सामना या वृत्तपत्राचे शहरात तसेच खेड्यापाड्यापर्यंत वाटप केले तद्नंतर माजी मंत्री प्रा. सुरेश (आण्णा) नवले यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली त्यांनी 1995-1999 कार्यकाळात शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना शिवसेना पक्ष फक्त शहरापुरता मर्यादित न ठेवता बीड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी, तांडा, वस्ती व पाड्यापर्यंत पोहोचून व शिवसेनेच्या शाखा स्थापन करून आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पक्षाची जिल्हाभर ताकद निर्माण केली होती.
या आणि अशा सर्व बाबींचा विचार करून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मा.खा.डॉ.श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ करून दाखवेन असा संकल्प आणि शब्द ॲड. चंद्रकांत नवले यांनी बोलताना दिला आहे.
यावेळी नियुक्तीपत्र देताना शिवसेना सचिव श्री. संजयजी मोरे, शिवसेना संपर्क नेते आमदार श्री. अर्जुनराव खोतकर, मराठवाडा संपर्क प्रमुख श्री. आनंदजी जाधव, शिवसेना सहसचिव श्री. एकनाथजी शेलार, आमदार दराडे साहेब यांचेसह आदी उपस्थित होते.
			





