गेवराई – बीड : दिवाळी सणाची खरेदी करताना, ग्राहकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने केले असून, सोने खरेदीत ही, मोठी अनागोंदी कारभार असल्याचे उघडकीस आले आहे. काही दुकानात ग्राहकांकडून तीन तर काही ठिकाणी सहा टक्के जीएसटी लावून ग्राहकांची लूट केली जात असल्याची चर्चा आहे. मागच्या दोन दिवसात सोन्या-चांदीचे भाव कमी होऊन ही, व्यापाऱ्यांनी ग्राहकांना चढ्या भावाने सोने दिले आहे. त्यामुळे, जागरूक नागरिकांनी दिवाळीचा फराळ ,सोने-चांदी सारख्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या, सगळीकडे दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठेत खरदी साठी मोठी गर्दी होत आहे. दिवाळी फराळाची मोठ मोठी दुकाने सजली आहेत. मात्र, जिथे क्वालिटी आहे. तिथेच ग्राहकांनी खरेदी करावी. अनेक दुकानात मिळाई, दुधाचे पदार्थ, चिवडा, इ. वस्तूंमध्ये भेसळ करण्याचे प्रकार उघडकीस येत असतात. सणासुदीत हे प्रकार सर्रास घडतात. तसेच, सोने व्यापार पेठेत जीएसटी घोटाळ्याचा ‘रंगीन’ खेळ सुरू आहे. सोने खरेदीवर ग्राहकांकडून नियमानुसार ३% जीएसटी (GST) वसूल केला जातो. मात्र, त्यांना रितसर पावती न देता, रंगीत बिलाचा कागद दिला जात आहे. जाणकार ग्राहकांनी ओरिजिनल बिल मागितल्यावर, ऑफ रेकॉर्ड सहा टक्के बिले लावून, ग्राहकांचा खिसा मारला जात आहे.
सोन्याच्या दुकानांमध्ये फलकांवर (बॅनरवर) सोन्याचा प्रति ग्रॅम मूळ भाव एक असतो. ‘जीएसटी प्लस’ भाव दुसरा असतो. खरेदी करताना, मूळ भावात तीन जीएसटी लावून सोन्याची विक्री केली जाते. पावती मात्र, जीएसटी क्रमांक (GSTIN) नमूद नसलेली दिली जाते. सब माल अंदर, असा हा गोलमाल असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातला शेतकरी आधीच अडचणीत आहे. अतिवृष्टीत बेजार झालेल्या शेतकर्यांना रितसर भावाने वस्तू दिल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
			




