गेवराई – बीड : गेवराई तालुक्यातील काही भागात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रोहीतळ ता.गेवराई येथील शेत शिवारात घडली आहे. घटनेत जखमी झालेल्या
रुक्मिण रामकिसन शिंदे
[ वय 55 ], विमल मोहन गायकवाड [ वय 58 ] यांना गेवराई शहरातील
सुर्या हाॅस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोमवार ता. 27 रोजी दु. 3 वाजता गेवराई तालुक्यातील विविध भागात पाऊस झाला. रोहीतळ ता. गेवराई येथील शेत शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने, वीज पडून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. कापूस वेचणी सोडून, मजुरांनी घरचा रस्ता धरला. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसापासून गेवराई तालुक्यातील विविध भागात कुठे ना कुठे सकाळी, दुपारी, रात्री पाऊस पडत आहे. दिवसभरात पाऊस पडत असल्याने, कापूस वेचनीत अडथळे निर्माण झाले आहेत. कापूस भिजू लागला आहे. काही ठिकाणी कापूस वेचनीला मजूर मिळत नसल्याने, कापासाच्या वाती होऊ लागल्यात. थोडाफार कापूस घरात येईल, या आशेवर असलेल्या शेतकर्यांना परतीच्या पावसाने हैराण करून सोडले आहे.गेवराई तालुक्यातील काही भागात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रोहीतळ ता.गेवराई येथील शेत शिवारात घडली आहे. घटनेत जखमी झालेल्या रुक्मिण रामकिसन शिंदे [ वय 55 ], विमल मोहन गायकवाड [ वय 58 ] या दोन्ही महिलांना गेवराई शहरातील सूर्या हाॅस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
			



