गेवराई : बीड : भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून, स्वतः पवार हे गेवराई पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाले होते. त्यानंतर, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मंगळवार ता. 16 रोजी पवार यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत युवा नेते बाळराजे पवार आणि माजी आमदार अमरसिंह पंडित गटात राडा झाला होता. दोन्ही गट आमने सामने आले होते. पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहायक अमृत डावकर यांच्या तक्रारीवरून आणखी एक कलम वाढवून पोलीसांनी सोमवारी पाचजणांना अटक केली. मंगळवारी अटक झालेल्यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.






