ती मुलगी पोलीसानी अखेर शोधलीच
गेवराई – गेवराई शहरातील पंचायत समिती जवळ असलेल्या चौकातून एका मुलीला गाडीत टाकून पळवून नेल्याची घटना गुरूवारी 12 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनेची दखल घेऊन, संबंधित गाडीचा पाठलाग करून शोध सुरू केला आहे. दरम्यान, सदरील मुलगी काॅलेज मधून पंचायत समिती जवळून जाणाऱ्या रस्त्यावरून शास्त्री चौकाकडे जात होती. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अल्टो गाडीतून आलेल्या तरूणांनी पायी जाणाऱ्या मुलीला बळजबरीने उचलून नेले. त्यावेळी, मुलीने जोरदार प्रतिकार केला. मात्र, दोघांना तिला मारहाण करून गाडीत टाकले. काही लोकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडी शास्त्री चौकातून पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने शहागड कडे गेली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, श्री. कोटकर यांनी चार चाकी गाडीचा पाठलाग केला असून, तपासाची चक्रे वेगाने फिरली आहेत. घटना नवरंग जनरल स्टोअर्स जवळ घडली.
अपहरण झालेली मुलगी परभणी शहरात पोलिसांना मिळाली आहे. अवघ्या काही तासात गेवराई च्या बहाद्दर पोलीसांनी त्या मुलीचा शोध घेतला. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर, दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारधी, पोलीस कॉन्स्टेबल आरेफ बागवान यांनी व परभणी पोलिसांनी केली आहे. गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






