गेवराई – बीड : गेवराई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवार ता.21 रोजी जाहीर होणार असून, कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी सर्व पक्षीय नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन गेवराई पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणुक निकालाच्या पार्श्वभुमीवर गेवराई शहरातील आणि परिसरातील
त्रेचाळीस जणांना तीन दिवसासाठी
हदपार करण्यात आले आहे. त्यामुळे, कोणीही कायदा हातात घेऊ नका, शहरातील वातावरण बिघडू देऊ नका. सामान्य नागरिकांना त्रास होईल, अशी कृती करणारांची गर केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा गेवराई पोलीसांनी दिला आहे.
गेवराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किशोर पवार यांच्या वतीने प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या मध्ये असे म्हटले आहे की, गेवराई शहरातील व ग्रामीण भागातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शहरामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही. याची दक्षता घ्यायची असून,
तसेच , कोणी गैरकृत्य करीत असल्यास त्या बाबत त्वरीत,गेवराई पोलीसांना माहिती द्यावी. शांतता भंग होणार नाही. याची काळजी घेण्यात यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
गेवराई शहरात पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली,अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या देखरेखीखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी, तेरा पोलीस अधिकारी, शंभर पोलीस अंमलदार, एस.आर.पी.एफ. सेक्शन , आर.सी.पी. प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया दरम्यान दोन गटात गोंधळ झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाच्या अनुषंगाने दिनांक 21 डिसेंबर रोजी रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, गेवराई शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करीता एकुण 43 जणांना तीन दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे.दिनांक 20 डिसेंबर पासेस ते 22 डिसेंबर पर्यंत गेवराई व बीड तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधितांना आदेश पारीत केले आहे. दिलेल्या कालावधीत प्रवेश न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्वांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सचिन पांडकर, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके , पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस ठाणे गेवराई यांनी केले आहे.






